भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

कोतवाल संघटनेचा संपावर जाण्याचा इशारा, राज्यभर कामबंद आंदोलन

जळगाव,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महसुल विभागात कोतवाल राज्याच्या तिजोरीत महसूल गोळा करुन देण्याच्या कामामध्ये प्रत्यक्ष मोठे सहाय्य करतो. शासनाने कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्यावा या मागणीसाठी मंगळवारपासून संप पुकारला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा निवेदन देण्यात आले आहे . या वेळी संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. दिलीप सावळे, जिल्हाध्यक्ष जितेंद्र चौधरी आदींसह कोतवाल कर्मचारी उपस्थित होते

या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोतवाल हा निवडणुक प्रक्रियामध्ये महत्वाच्या कामाची जाबाबदारी पार पाडतो. महसूल प्रशासनात नित्यनियमाची कामे व क्षेत्रीय कामे इमाने इतबार पार पाडतो बरेच ठिकाणी तालुका स्तरावर शिपाई, संगणक चालक, टपाल ने-आण करणे, संकलनाची कामास सहाय्य करणे अशी विविध प्रकाराचे कामे करीत आहे. हया बाबीचा विचार होणे आवश्यक आहे. राज्यातील कोतवाल कर्मचारी यांची कोठेही शासन विरोधी भूमिका नसुन केवळ शासनाचे लक्ष वेधण्याच्या हेतुने हे आंदोलन करीत आहे.

तसेच मंत्रालय स्तरावरील कोतवाल संवर्गास चतुर्थ श्रेणीचा दर्जा व इतर प्रलंबित मागण्या पुर्ण न झाल्यास शासनाच्या विरोधात नसुन केवळ शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २५ सप्टेंबरपासुन राज्यभर कामबंद आंदोलन व दिनांक २६ पासुन आझाद मैदान, मुंबई येथेमागण्या पूर्ण होई पर्यंत धरणे आंदोलन महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!