लाखो रुपये खर्च करून पाईप लाईन अभावी बंद ऑक्सिजन प्लॅन्ट सुरू करावा – रोहिणी खडसे यांची मागणी
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l कोविड काळात ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा भासत होता ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागत होते अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून त्या वेळी शासनाने प्रमुख ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारणी करण्याचा निर्णय घेतला होता. उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे सुद्धा जिल्हा नियोजन समिती अंतर्गत 80 लाख रुपये निधी खर्च करून ऑक्सिजन प्लांट ची उभारणी केली
परंतु यातून फक्त प्लांट ची उभारणी केली असुन त्यासाठी लागणाऱ्या पाईपलाईन व इतर यंत्रणेची उभारणी करण्यात न आल्याने हा प्लांट वापरा अभावी धूळखात पडला आहे
पाईपलाईन व इतर यंत्रणा उभारणी साठी निधी मंजुर नसल्याचे संबंधितांकडून सांगण्यात येते.
ज्या लोकप्रतिनिधी यांनी हा प्लांट उभारण्याचा गाजावाजा केला यावर राजकारण केले त्यांनी प्लांट ची उभारणी होऊन प्लांट सुरू व्हावा प्तो पुर्णतः कार्यरत होण्यासाठी आवश्यक असलेल्या पाईप लाईन व इतर यंत्रणेची उभारणी व्हावी
याचे सुद्धा भान बाळगणे गरजेचे होते. आता एवढा 70 ते80 लाख रुपये निधी खर्च करून हा ऑक्सिजन प्लांट शोभेची वस्तू बनून राहिला आहे. लवकरात लवकर पाईपलाईन व इतर आवश्यक यंत्रणेची उभारणी केली गेली नाही तर वापरा अभावी या प्लांटच्या मशिन कालबाह्य होऊन भंगारात काढण्याची परिस्थिती निर्माण होईल.
तरी शासनाने तात्काळ पाईपलाईन व इतर यंत्रणेची उभारणी करून या ऑक्सिजन प्लांटचा उपयोग सुरू करावा जेणेकरून झालेला खर्च वाया जाणार नाही व आता प्लांट असुन सुद्धा बाहेरून ऑक्सिजन सिलेंडर आणण्यासाठी जो खर्च करावा लागत आहे तो वाचेल असे आज अचानक राष्ट्रवादी शरद पवार गटाचा महिला प्रदेश अध्यक्ष यांनी आज ऑक्सिजन प्लॅन्ट ला भेट देऊन तो बंद असल्याचे जनतेच्या लक्षात आणुन देत तो सुरु करण्याची मागणी केली यावेळी त्यांचा सोबत अतुल पाटील,प्रवीण पाटील , बाळा चिंचोले,निलेश भालेराव, बापू ससाणे,राहुल पाटील,भैय्या पाटील,प्रवीण पाटील,प्रदीप साळुंके, जुबेर अली, अयाज़ पटेल,एजाज़ खान, फिरोज़ सय्यद, इरफ़ान खान, वहाब खान, सलीम शेख यां सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.