प्रतीक्षा संपली, बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींची बाजी
पुणे, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l निकालाची उत्सुकता संपली असून बारावीचा निकाल लागलेला आहे . महाराष्ट्र राज्य माध्यामिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. आज मंगळवारी या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. .
बारावीच्या परीक्षेत एकूण ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यामिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. बारावीचा निकाल विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने दुपारी १ वाजता पाहू शकतात.
महाराष्ट्र राज्य माध्यामिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत या निकालाची माहिती दिली. बारावीची परीक्षा ही २१ फेब्रुवारी २३ मार्च २०२४ दरम्यान घेण्यात आली होती. आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकाल जाहीर केला. यंदा राज्याचा बारावीचा ९३.३७ टक्के लागला. बारावीची एकूण १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी या परीक्षेत एकूण १३ लाख २९;हजार ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या वर्षी देखील मुलींनी बाजी मारल्याचं दिसून आलं.