भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराष्ट्रीयसामाजिक

मोदी सरकारचा मोठा निर्णय : पुढील ४ वर्ष मिळणार मोफत धान्य

नवी दिल्ली, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l मोदी सरकारनं प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत मोफत रेशन योजना वाढवण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मोफत धान्य वितरणासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता देशातील गरीब जनतेला पुढील चार वर्षे मोफत धान्य मिळणार आहे. केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी देशातील सर्वासामान्य जनतेला मोठी भेट दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात माहिती दिली. ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न’ योजना पुढील चार वर्षांसाठी म्हणजेच २०२८ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनांतर्गत मोफत धान्याच्या वितरणाला डिसेंबर २०२८ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. पोषण सुरक्षा वाढवणे हा या मागचा महत्त्वाचा आहे. तसेच या योजनेसाठी केंद्र सरकारने १७ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याशिवाय देशातील गरजूंपर्यंत मोफत धान्य पोहोचवण्यासाठी पुरवठा साखळी विकसित करण्यात येणार असल्याची माहितीही अश्विनी वैष्णव यांनी दिली. तसेच या धान्याची गुणवत्ता तपासण्यासाठी ५२ प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

देशातील ८० कोटी लोकांना होणार फायदा :’प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न’ या योजनेंतर्गत गरीबांना दरमहा ५ किलो मोफत राशन दिलं जातं. केंद्र सरकारनं या योजनेला १ जानेवारी २०२४ पासून पुढील ५ वर्षांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलाय. कोरोनाच्या काळात गरीबांना मदत करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. सरकारच्या या घोषणेचा थेट फायदा देशातील ८० कोटी लोकांना होणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!