या क्षणाची सर्वात मोठी बातमी : राज्यात आज आचारसंहिता लागणार, निवडणुकीच बिगुल वाजणार
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आज मंगळवार रोजी दुपारी ३.३० वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. आज विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार असून राज्यात आजपासून आचारसंहिता जारी होईल. निवडणुकीच्या तारखाही आज जाहीर होणार.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज मंगळवार रोजी दुपारी ३ ३० वाजता पत्रकार परिषद होणार आहे. महाराष्ट्रात २८८ जागांसाठी निवडणुका होणार असून २८ नोव्हेंबर रोजी विधेनसभेचा कार्यकाळ संपणार आहे, त्याआधी राज्यातील विधानसभा होतील, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. आज निवडणुकीची घोषणा जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू होणार आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आणखी तीव्र होणार आहे. निवडणूक आयोग आज निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, १० नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर यादरम्यान राज्यात मतदान होईल. २० ते २५ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. २६ नोव्हेंबर रोजी राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे, त्याआधी नवे सरकार सत्तेत येईल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले होते.