भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

मान्सून बाबत मोठी बातमी, केव्हा दाखल होणार महाराष्ट्रात, यंदा कसं असणार पावसाचं प्रमाण

मुंबई,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l मान्सूनबाबत मोठी बातमी समोर आली आहे,मान्सूनबाबत दिलासादायक बातमी आहे. पावसाबाबत हवामान खात्याकडून नवा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यावर्षी देशात पवासाचं प्रमाण हे सरासरीपेक्षा अधिक राहणार असून, मान्सूनच आगमण देखील वेळेत होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून (IMD)देण्यात आली आहे.हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार यंदा ३१ मे रोजीच केरळात मान्सून दाखल होणार आहे. त्यानंतर साधारणपणे सात जून रोजी मान्सूनचं तळकोकणात आगमण होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

यंदा हवामान विभागाकडून मान्सूनबाबत समाधानकारक अंदाज वर्तवण्यात आल्यानं शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात गेल्या वर्षी मान्सून उशिरानं दाखल झाला होता, आकरा जूनला मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालं होतं. मात्र यावेळी सात जूनलाच मान्सून राज्यात दाखल होईल असं हवामान विभागानं म्हटलं आहे.तसेच यंदा राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. राज्यात १०६ टक्के इतका पाऊस पडू शकतो असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

दरम्यान, अजूनही काही दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं संकट कायम असणार आहे. हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असून आज देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेजं अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!