क्राईमजळगाव

कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा, पाच पीडित महिलांची सुटका

जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी आठ ते साडे आठ वाजेच्या दरम्यान जळगाव एमआयडीसी एरियातील जी-सेक्टर मधील सागर हॉटेल व लॉजिंग मध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकून पोलिसांनी पाच महिलांची सुटका केली.

यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, जळगाव एमआयडीसीतील जी सेक्टरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याच्या माहिती वरून एमआयडीसी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या पथकाने सागर हॉटेल व लॉज वर छापा टाकून पाच पिडीत महिलांची सुटका केली. तसेच त्या ठिकाणाहून वेश्याव्यवसायाला लागणारे साहित्य ही जप्त केले. या संदर्भात सागर हॉटेल व लॉज चे मालक सागर नारायण सोनवणे व मॅनेजर सागर सुधाकर पाटील यांचेवर एमआयडीसी पोलीस स्टेशन ला पोलीस कॉन्स्टेबल सपना येरगुंटला यांच्या फिर्यादवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय बडगुजर,महिला पोलीस कॉन्स्टेबल सुनंदा तेली, पोलीस नाईक विकास सातदिवे, पोहेकॉ रामदास कुंभार मुकुंदा पाटील,  विनोद भास्कर, भरत डोके यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!