भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमराजकीयराष्ट्रीय

काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला प्रवक्त्यांचा पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप, “दरवाजा बंद होता, मी ओरडले, खोली बंद करून माझ्यासोबत…..!”

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l एका नेत्याने आपल्यासोबत बंद खोलीत गैरवर्तन केल्याचा आरोप खेडा यांनी केला आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या राधिका खेडा यांनी रविवारी पक्षाला रामराम ठोकला. काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या नेत्या राधिका खेडा यांनी पक्षातील नेत्यांवर अनेक गंभीर आरोप करत आपल्यासोबत झालेल्या गैरवर्तनाची माहितीही त्यांनी दिली. या प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे.

खेडा यांनी आज मीडियाशी बोलताना मोठे खुलासे करत त्या म्हणाल्या, काँग्रेस सनातनविरोधी असल्याचे मी नेहमी ऐकत होते. पण त्यावर विश्वास नव्हता. मी रामलल्लाच्या दर्शनाला आईला घेऊन अयोध्येला गेल्यानंतर सत्य समोर आले. ध्वज लावल्यानंतर काँग्रेसच्या लोकांनी विरोध केला. मला प्रत्येक वेळी अपमानित करण्यात आले. माझ्या चरित्रावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान छत्तीसगडमध्ये पक्षाच्या मीडिया प्रमुखांसह काही जणांनी माझ्या रुमकडे येऊन मला दारू ऑफर केली होती. सचिन पायलट आणि जयराम रमेश यांना याबाबत सांगितले होते, असा दावा खेडा यांनी केला आहे.

छत्तीसगडमधील पक्षाच्या मुख्यालयात ३० एप्रिलला मीडिया सेल प्रमुख सुशील आनंद शुक्ला यांनी माझ्यासोबत गैरवर्तन केले. कार्यालयाचा दरवाजा बंद केला होता. एक मिनिट दरवाजा बंद होता. मी ओरडले, पण मदतीसाठी कुणीच आले नाही. मी तिथून कशीबशी बाहेर पडले. या प्रकारा बाबत मी सगळ्यांकडे तक्रार केली. पण कुणीच माझे ऐकले नाही, याबाबत राहुल गांधींसह प्रियांका गांधी व इतर नेत्याकंडेही संबंधितांवर कारवाईबाबत मदत मागितली होती. पण कुणीच पुढे आले नाही. असे गंभीर आरोप खेडा यांनी केले आहेत.

तसेच या घटनेबाबत भूपेश बघेल यांना सांगितल्यानंतर त्यांनी छत्तीसगड सोडून जाण्यास सांगितले. राहुल गांधी मुल्लिकार्जून खर्गे, प्रियांका गांधी या सगळ्यांना मेसेज पाठवला पण काहीच उत्तर आले नाही. ट्विट केल्यानंतर जयराम रमेश यांचा कॉल आला. पण हे प्रकरण दाबण्यात आले. महिलांसोबत अन्याय झाल्यानंतर पक्षातून काढले जाते. पण माझी लढाई सुरूच राहील, असे खेडा यांनी म्हटले आहे. मी इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचे खेडा यांनी स्पष्ट केले.आता आपण कायदेशीर लढाई लढत आरोपींना शिक्षा देणार असल्याचे खेडा यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!