भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : आज पासून जमा होणार लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. आज पासून मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात आठवा हप्ता जमा होणार आहे. आज पासून १५०० रुपये बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीचा हप्ता आज पासून द्यायला सुरुवात होणार आहे. यासाठी वित्त विभागाकडून ३४९० कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. दरम्यान, यावेळी जानेवारीच्या तुलनेमध्ये फेब्रुवारीत लाभार्थींची संख्या घटण्याची शक्यता आहे.

लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता कधी जमा होणार? असा सवाल उपस्थित केला जात होता. पण आता आजपासूनच लाडकी बहिण योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. डिसेंबर अखेर २ कोटी ४६ लाख महिला लाभार्थी होत्या. त्यातील ५ लाख महिला अपात्र झाल्यानंतर जानेवारीअखेर २ कोटी ४१ लाख लाभार्थी महिला होत्या. मात्र, अद्याप फेब्रुवारी अखेरची आकडेवारी आलेली नाही. मात्र, त्यातही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कमी केलेल्या महिलांची संख्या ९ लाख होणार आहे. यापूर्वी ५ लाख महिलांची नावे कमी करण्यात आली होती. आता नव्याने ४ लाख महिलांची संख्या कमी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या ९४५ कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!