ब्रेकिंग : पैसे मोजण्याच्या मशीन सह लाखो रुपये जप्त, मोठी कारवाई
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आता पर्यंत लोकसभा निवडणुकीच तीन टप्प्यांचं मतदान पार पडलं आहे. सोमवारी लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. दरम्यान मतदानाच्या एक दिवस आधी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ३९ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. इतकचं नव्हे तर त त्या सोबत पैसे मोजण्याच मशीन सुद्धा जप्त करण्यात आले आहे.
या प्रकरानं मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार दी. १३ मे रोजी लोकसभेच्या चौथ्या टप्प्याच मतदान होत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्येही सोमवारी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत असून, मतदानाच्या एक दिवस आधी पोलिसांनी तब्बल ३९ लाखांची रोकड जप्त केली आहे. पोलिसांनी या छाप्यात रोख रकमेशिवाय पैसे मोजण्याचे यंत्र आणि मोबाईल देखील जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत चार आरोपींना अटक केली असून, त्यांची कसून चौकशी केली जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा पैसा कुठून आला आणि कुठे दिल्या जाणार होता याचा तपास पोलीस करत आहेत. याप्रकरणी आयकर विभागालाही माहिती देण्यात येत असल्याचे पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी पत्रकारांना सांगितले. याप्रकरणी संभाजीनगर मधील क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.