राज्य उत्पादन शुल्क भुसावळ विभागाचे फरार दुय्यम निरीक्षक सोनवणे यांचा अटक पूर्व जमीन अर्ज नामंजूर
भुसावळ कोर्टाचा निर्णय
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l दारूच्या बाटल्या पकडुन केस न करण्यासाठी लाच घेणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क भुसावळ विभागाचे दुय्यम निरीक्षक राजकिरण दिपक सोनवणे, ( दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भुसावळ विभाग जि. जळगाव) यांचा विशेष न्यायाधिश, अति व जिल्हा सत्र न्यायालय भुसावळ यांनी अटक पुर्व जामिन अर्ज नामजुर केला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, दि.१९.११.२०२४ रोजी यातील फिर्यादी यांचे रहाते घरून राज्य उत्पादन शुल्क भुसावळ विभागाचे दुय्यम निरीक्षक राजकिरण सोनवणे, यांनी ३० ते ३५ हजार रूपये किमतीच्या दारूच्या बाटल्या पकडून फिर्यादीवर केस न करण्याच्या मोबदल्यात ४० हजार रूपयांची लाच मागणी करून त्यापैकी १० हजार रूपये रक्कम जागीच स्वीकारली होती व उर्वरित ३०,०००/- हजार रूपये लाच रक्कम राजकीरण दीपक सोनवणे यांनी किरण माधव सुर्यवंशी यांचे मार्फत फिर्यादीकडुन स्विकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडुन त्यांच्यावर फैजपुर पो.स्टे.गु.र.नं. २८८/२०२४, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ अ व १२ प्रमाणे दाखल गुन्हयातील दि.२३.११.२०२४ रोजी दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयातील राजकिरण सोनवणे हे गुन्हा घडल्यापासुन पसार झाले आहेत. गुन्हयाचे तपास कामी सोनवणे हे भुसावळ येथिल राहत असलेल्या भाडयाचे घराची व त्याचे कार्यालयीन कॅबिनची घरझडती घेतली असता त्यात देशी, विदेशी, बियरच्या बाटल्या व गावठी हात भट्टीची दारू एकुण १,८१,५२०/- रूपये किमतीचा अवैध मदय साठा मिळुन आला आहे. राज किरण सोनवणे यांचे राहते घरात मिळुन आलेल्या अवैध मदयसाठयाबाबत त्याचे विरूध्द दारूबंदी अधिनियम अतंर्गत राज्य उत्पादन शुल्क जळगाव येथे स्वतंत्रपणे गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.
आरोपी राजकिरण सोनवणे यांचे घरात घरझडती दरम्यान रोख रक्कम, सोन्याचे दागिने, ९ एम एम बुलेटचे १० रिकामे केज (पुंगळ्या) व सोने खरेदी विकिच्या १९ पावत्याच्या पावत्या मिळुन आल्या.
फरार असलेले भुसावळ विभागाचे दुय्यम निरीक्षक राजकिरण सोनवणे यांनी अटकेपासुन संरक्षण मिळावे यासाठी मा. अति.व जिल्हा सत्र न्यायालय भुसावळ येथे अटक पुर्व जामिन अर्ज दाखल केला होता.
त्याप्रमाणे आरोपी राजकिरण सोनवणे यांचा अटकपूर्व जामिन अर्ज नामजुर करण्यात यावा यासाठी सहा. सरकारी अभियोक्ता भुसावळ यांचे मार्फत न्यायालयात दि. ०६.१२.२०२४ व ०९.१२.२०२४ रोजी दाखल करण्यात आला होता.
दि.१०.१२.२०२४ रोजी आरोपी राज किरण सोनवणे यांचे जामिन अर्जावर सरकार तर्फे अॅड.श्री. मोहन देशपांडे यांनी कामकाज करून अहवालात सादर केलेल्या मुद्याचे आधारे अर्जदार सोनवणे यांचा अटकपूर्व जामिन अर्ज नामंजूर करण्यात यावा असा युक्तीवाद केला होता. त्याप्रमाणे न्यायालयाने आरोपी अर्जदार राजकिरण दिपक सोनवणे यांचा अटकपूर्व जामिन अर्ज नामजुर केला आहे.आता आरोपी म्हणून फरार असलेले राज्य उत्पादन शुल्क भुसावळ विभागाचे दुय्यम निरीक्षक राज किरण दीपक सोनवणे हे स्वतःहून हजार होतात की त्यांना शोधून अटक केली जाते हे येणाऱ्या काळातच समजेल.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा