भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

फैजपूर पालिकेच्या सभेत मोठ्या प्रमाणावर नगरसेवकांची अनुपस्थिती : तर्क-वितर्कांना जोर

फैजपूर, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज |फैजपूर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी पालिकेच्या सभागृहात पार पडली. या सभेला नगराध्यक्ष सौ. दामिनी सराफ, मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांच्यासह सहा नगरसेवक व दोन स्वीकृत नगरसेवक उपस्थित होते. मात्र एकूण १३ नगरसेवक गैरहजर राहिल्याने शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे.

विशेष म्हणजे उपनगराध्यक्ष निकिता कोळी तसेच भाजपचे गटनेतेही या सभेस अनुपस्थित राहिल्याचे दिसून आले. लोकप्रतिनिधींच्या इतक्या मोठ्या संख्येने अनुपस्थितीमुळे सभेतील चर्चाबाबत व संभाव्य निर्णयांबाबत नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या अनुपस्थितीमागे राजकीय कारणे आहेत का, असा सवाल उपस्थित होत असून राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना जोर आला आहे. दरम्यान, अनेक नगरसेवकांच्या अनुपस्थितीमागील नेमकी कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. त्यामुळे शहरातील नागरिकांसह राजकीय क्षेत्रातही या घटनेबाबत उत्सुकता वाढली असून सभेला नगरसेवकांची अनुपस्थिती ला नेमकं कारण काय आहे. या संदर्भात अनेक तर्कवितर्क मांडले जात अनेक कारणे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फैजपूरच्या राजकारणात या घटनेची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

नगरसेवकांमधील अंतर्गत मतभेदांमुळेच हे नगरसेवक सभेला गैरहजर राहिल्याचा आरोप करण्यात येत असून नगरपालिकेच्या सभेतील अनुपस्थितीच्या मुद्द्यावरून फैजपूरच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून याचे पडसाद आगामी काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!