भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

मुक्ताईनगर पोलिस स्टेशन हद्दीत गुटखा तस्करांचे मोठे रॅकेट, चौकशी करण्याची सुनील पाटील यांची मागणी

स्थानिक पोलीस व अन्न,औषध प्रशासनाशी सडेलोटे असल्याचा आरोप

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l मुक्ताईनगर पोलिस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध गुटखा तस्करी व इतर अवैध धंद्यांचे रॅकेट उघडकीस येत आहे. या संदर्भात शिवसेना जिल्हा संघटक सुनील पाटील यांनी पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, यांना सखोल चौकशीची मागणी करणारे निवेदन दिले आहे.

शिवसेना जिल्हा संघटक सुनील पाटील यांनी आपल्या निवेदनात नमूद केले की, मुक्ताईनगर तालुका हा महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमेवर असल्यामुळे गुटखा तस्करांसाठी प्रमुख मार्ग ठरत आहे. विशेष म्हणजे, स्थानिक पोलीस व अन्न व औषध प्रशासनातील काही अधिकारी तस्करांशी अर्थपूर्ण साटेलोटे करून तस्करीला पाठिंबा देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

२ कोटींचा गुटखा जप्त:
नुकतेच दोन ते तीन दिवसांपूर्वी सुमारे 2 कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. याआधीही लाखो रुपयांचा गुटखा तस्करीसाठी पकडण्यात आला आहे. विशेष म्हणजे, जळगाव येथून येणाऱ्या पथकांनी ही कारवाई केली, परंतु स्थानिक पोलिसांनी या कारवायांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.

संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी:
शिवसेना जिल्हा संघटक सुनील पाटील यांनी मागणी केली आहे. की, या तस्करीत मोठे रॅकेट सक्रिय असून स्थानिक पोलीस व अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी.

आंदोलनाचा इशारा:
जर वेळेत योग्य ती कारवाई झाली नाही, तर आगामी विधानभवन अधिवेशनात मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे प्रशासनाने त्वरित लक्ष घालून कारवाई करण्याची गरज आहे.शिवसेना जिल्हा संघटक सुनील पाटील यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. या संदर्भात आ. चंद्रकांत पाटील यांनाही याबाबत निवेदन देण्यात आले असून, पोलिस अधीक्षक जळगाव व उपविभागीय पोलीस अधिकारी मुक्ताईनगर यांनाही याची प्रत पाठवण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!