भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

बिग ब्रेकींग : मुक्ताईनगरात गुटख्याचा मोठा साठा असलेला ट्रक पकडला !

मुक्ताईनगर-मंडे टू मंडे न्युज, अक्षय काठोके | तालुक्यातील अवैध गुटखा वाहतुकीसह विक्री होत असल्याची मोठी चर्चा असताना विधानपरिषदेत आ. एकनाथ खडसे यांनी गुटखा तस्करी गाजली असतांनाच आज पुन्हा एकदा अवैध गुटखा वाहतूक करणारी ट्रक पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हा गुटखा लाखो करोडोंच्या घरात असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

पोलिस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून शहरातून वाहतूक होत असल्याचे गेल्या १५ दिवसांत दुसरेंदा दिसून आले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने एचआर ५५ एम-४९८० क्रमांकाचे आयशर वाहन पकडले. यात राज्यात प्रतिबंधीत असलेल्या विमल गुटख्याचा साठा मोठ्या प्रमाणात आढळून आला असून कारवाईत नेमका किती साठा जप्त करण्यात आला याची माहिती मिळाली नसली तरी हा आकडा मोठा असण्याची शक्यता असून लाखों ते कराडोंच्या घरात हा साठा असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

आ. एकनाथ खडसे यांनी तर बऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्यांकडून पोलीसांना १५ लाखांचा हप्ता दिला जात असल्याचा आरोप ‘मंडे टू मंडे न्युज’ शी मुलाखतीत बोलताना केला होता. तसेच विधानपरिषदेत मुक्ताईनगर तालुक्यातील अवैध धंद्याबाबत पोलिसांच्या कार्यक्षतेवर प्रश्न उपस्थित केले होते. यात त्यांनी गांजा, जुगाअड्ड्यासह मध्यप्रदेशातून गुटखा मोठ्या प्रमाणात मुक्ताईनगर तालुक्यासह जिल्ह्यात येत असून यातून करोडो रूपयांची उलाढाल होत असल्याचा आरोप केला होता. यानंतरची ही दुसरी कारवाई करण्यात आल्याने ही बाब लक्षणीय मानली जात आहे. या संदर्भात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!