शाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पँकिंग दुधात जिवंत अळ्या
मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l एक धक्कादायक प्रकार समोर आला असून या धक्कादायक प्रकाराने मोठी खळबळ उडाली आहे, शाळेत विद्यार्थ्यांना नाष्ट्यात दिल्या जाणाऱ्या पँकिंग दुधात जिवंत अळ्या आढळून आल्या आहेत. या मुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,निवासी आदिवासी इंग्रजी माध्यम आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना नाष्ट्यात दिल्या जाणाऱ्या पँकिंग दुधात जिवंत अळ्या आढळून आल्या आहेत. ही घटना पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील निवासी आदिवासी इंग्रजी माध्यम आश्रम शाळेतील आहे.