भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राष्ट्रीय

1 जानेवारीपासून GST चा नियम बदलणार

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): वित्त मंत्रालयाने नुकतंच 50 लाखाहून अधिक मासिक टर्नओव्हर असलेल्या कंपन्यांना 1 टक्के जीएसटी हा कॅशमध्ये भरणं अनिवार्य (GST new rule) केलं होतं. बनावट बिलांद्वारे होणाऱ्या कराची चोरी रोखण्यासाठी हा नियम जारी करण्यात आला होता. यामध्ये मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, देशातील 45 हजार व्यापारी नव्या नियमांमध्ये मोडत आहेत. या व्यापाऱ्यांना 1 टक्के जीएसटी हा रोकडा भरावा लागणार आहे.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हा नवा नियम (GST Cash Payment rule) 1 जानेवारी 2021 पासून लागू करण्यात येणार आहे. तर नवीन नियमांतर्गत, एकूण व्यवसाय नोंदणींपैकी फक्त 0.37 टक्के करदाता आहेत. महसूल विभागानं यासंबंधी माहिती दिली आहे. सीबीआयसीने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, एका महिन्यात करपात्र पुरवठा करण्याचं मूल्य 50 लाखांपेक्षा जास्त असेल तर कोणतीही नोंदणीकृत व्यक्ती इलेक्ट्रॉनिक पत खात्यात उपलब्ध असलेली रक्कम 99 टक्क्यांहून अधिक कर भरण्यासाठी वापरु शकत नाही.

जीएसटीचे रजिस्टर्ड करदाते 1.2 कोटी आहेत

जीएसटीचे देशभरात एकूण 1.2 कोटी नोंदणीकृत करदाते आहेत. यापैकी 4 लाख असे करदाते आहेत ज्यांचे मासिक पुरवठा मूल्य l50 लाखाहून अधिक आहे. यापैकी 1.5 लाख करदाता हे कराच्या 1 टक्क्यांपेक्षा कमी रक्कम भरतात.

दरम्यान, जर कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी किंवा कोणत्याही भागीदाराने मागच्या आर्थिक वर्षात न वापरलेल्या इनपुट टॅक्स क्रेडिटवर एक लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न कर भरला किंवा नोंदणीकृत व्यक्तीने एक लाखाहून अधिक रकम परतावा मिळवला तर त्यांना यामध्ये सहभागी करण्यात आलेलं नाही.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!