ब्रेकिंग| मोरगांवच्या जुगार अड्ड्यावर एलसीबीची धाड, १७ जण ताब्यात !
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा | तालुक्यातील मोरगाव येथे सुरू असलेल्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर मध्यरात्री एलसीबीने छापेमारी करत कार आणि दुचाकीसह लाखोंची रोकड व १७ जुगाऱ्याना ताब्यात घेतले असून स्थानिक पोलिसांना येथे जुगार अड्ड्याची माहिती नव्हती का ? या कारवाईने स्थानिक पोलीस प्रशासनावर प्रश्न चिन्ह निर्माण होत असून रावेर तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
रावेर तालुक्यात जुगार अड्ड्याना अच्छे दिन आलेले असताना मोरगांव येथे आज होळीच्या पूर्वसंध्येला प्रल्हाद पाटील यांच्या घराच्या आत वॉल कंम्पाउड मध्ये हायप्रोफाईल जुगार अड्डा सुरु असल्याच्या गोपनीय माहितीनुसार जळगाव एलसीबीकडून मध्यरात्री ३:३० ते ४ वाजेच्या सुमारास जुगार अड्ड्या चालू असलेल्या ठिकाणी धाड टाकली. यावेळी अचानक पोलीस आल्याचे दिसतात जुगारी पळवाट दिसेल तिकडे पळू लागले. पोलिसांनी पाठलाग करुन १७ जणांना ताब्यात घेतले.
यात संदीप दिनकरराव देशमुख (वय-४८) रा. पुर्णाड ता. मुक्ताईनगर, संजय दर्शन गुप्ता, शांताराम जीवराम मंगळकर, रा. लालबाग, मध्यप्रदेश, समधान काशिनाथ कोळी रा. सांगवा ता. रावेर, कासम महेबुब तडवी रा. पिंप्री ता. रावेर, जितेंद्र सुभाष पाटील रा. विवरा ता. रावेर , कैलास नारायण भाई रा. भाईवाडा ता. रावेर, मनोज दत्तू पाटील रा. पिंप्री ता. मुक्ताईनगर, मनोज अनाराम सोळंखे रा. आलमगंज बऱ्हाणपूर, सुधिर गोपालदास तुलसानी रा. बऱ्हाणपूर, रविंद्र काशिनाथ महाजन रा. वाघोदा ता. रावेर, बापु मका ठेलारी ता. पुर्णाड ता. मुक्ताइ्रनगर, राजू सुकदेव काळे रा. बऱ्हाणपूर, युवराज चिंधू ठाकरे रा. रावेर, सोपान एकनाथ महाजन रा.बऱ्हाणपूर, प्रल्हाद पाटील रा. मोरगांव ता.रावेर यांच्यासह इतरांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये पोलीसांनी १ लाख ४६ हजारांची रोकड, ८ चारचाकी वाहने, ६ दुचाकी असा एकुण ५५ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि अमोल देवढे, सहाय्यक फौजदार रवि नरवाडे, युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ कमलाकर बागुल, महेश महाजन, संतोष मायकल, किरण धनगर, श्रीकृष्ण देशमुख, भारत पाटील, प्रमोद ठाकूर तसेच रावेर पोलीस ठाण्याचे पोउनि बाळासाहेब नवले, पो.कॉ. समाधान ठाकूर, विशाल पाटील, प्रमोद पाटील, सचिन घुगे यांच्यासह आदींनी कारवाई केली आहे.