नायलॉन मांजा विक्रेत्यांवर एलसीबी ची कारवाई, नायलॉन मांजा जप्त
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l मांजा विक्रीवर बंदी असताना जळगाव जिल्ह्यात नायलॉन मांजा विक्री बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कठोर कारवाई केली.जळगाव मधील पतंग गल्ली (जोशी पेठ) आणि भुसावळ शहरातील काही ठिकाणी छापे मारण्यात आले. यामध्ये नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात मांजा जप्त करण्यात आला आहे.
भुसावळ येथील सराफ बाजार परिसरात अजय काईट दुकानावर छापा टाकून संशयित आरोपी नितीन गोपाळ पत्की याच्याविरुद्ध गुन्हा दाखल असून ६ नायलॉन मांजाचे चक्री, किंमत १ हजार ४०० रुपयांचा जप्त करण्यात आला आहे.
तसेच जळगाव मधील जोशी पेठेतील किरण भगवान राठोड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून ४ हजार ८०० रुपयांच्या १६ नायलॉन मांजाचे चक्री जप्त करण्यात आली आहे. तर याच भागातील कुणाल नंदकिशोर साखला याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्या कडून ८ हजार ८०० रुपयांचा ३२ नायलॉन मांजाचे चक्री जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांचे मार्गदर्शनाखाली स.फौ रवि नरवाडे, अतुल वंजारी, गोपाल गव्हाळे, सचिन पोळ, प्रदीप सपकाळे, प्रदीप चवरे आदींनी केली.