भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

प्रशासनराष्ट्रीय

आता कायदा आंधळा नाही… न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळीपट्टी हटवली, हातात तलवार नव्हे तर संविधान

नवी दिल्ली, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आता पर्यंत तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधलेली न्यायदेवतेची मूर्ती बघितली आहे. भारतातील कोणत्याही न्यायालयात न्यायदेवतेची मूर्ती दिसते. न्यायदेवतेच्या हातात तराजू, तलवार असते आणि त्याच बरोबर तिच्या डोळ्यांवरपट्टी दिसते. अनेकदा हिंदी चित्रपटांमध्ये यावरून तुम्ही संवाद देखील ऐकला असेल. भारतीय न्यायालयाने आता ब्रिटिश काळातील परंपरा मागे टाकून नवी पद्धत स्विकारण्यास सुरुवात केली आहे. काही दिवासांपूर्वी ब्रिटिश कायद्यांमध्ये बदल करण्यात आले होते. आता भारतातील न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी हटवण्यात आली आहे .

आता न्यायदेवतेच्या मूर्तीत बदल करण्यात आले आहेत.
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी यासंदर्भातील बदलांसाठी पुढाकार घेतला होता. आता त्यांच्या आदेशानुसार सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या ग्रंथालयासमोर न्यायदेवतेची नवी मूर्ती लावण्यात आली आहे. आधीच्या मूर्तीवर डोळ्यांवर पट्टी लावलेली असायची आणि एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात शिक्षा देण्यासाठी तलवार असायची.आता नव्या मूर्तीच्या डोळ्यावरील पट्टी हटवली गेली आहे. तसेच हातात तलवारच्या ऐवजी संविधानाची प्रत दिसते.

सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यामते कायदा कधीच अंध असू शकत नाही. तो सर्वांना समान पद्धतीने पाहतो. आता आपल्याला ब्रिटिशांच्या परंपरा आणि वारशाच्या पुढे गेले पाहिजे. यामुळेच सरन्यायाधीश न्यायदेवतेच्या मूर्तीत बदल केला जाण्याची गरज असल्याचे म्हटले होते. त्याच बरोबर देवीच्या एका हातात तलवारच्या जागी संविधान पाहिजे. ज्यामुळे समाजात संदेश जाईल की देवी संविधानानुसार न्याय करते.

सरन्यायाधीशांच्या मते तलवार हिंसेचे प्रतीक आहे. न्यायालयात हिंसा नाही तर संविधानाच्या कायद्यानुसार न्याय होतो. दुसऱ्या हातात असलेला तराजू योग्य आहे जो सर्वांना समान पद्धतीने न्याय देते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दिलेल्या आदेशानंतर न्यायदेवतेची नवी मूर्ती तयार करण्यात आली. अशी पहिली मूर्ती न्यायधीशांच्या ग्रंथालयाबाहेर लावण्यात आली. ज्या मूर्तीच्या डोळ्यावर पट्टी नाही आणि हातात तलवार ऐवजी संविधान आहे.

न्यायदेवतेची मूळ मूर्ती यूनानमधील प्राचीन देवी असल्याचे सांगितले जाते. तिला न्यायाचे प्रतीक म्हटले जाते. या देवीचे नाव जस्टिया असून त्यातूनच जस्टिस हा शब्द तयार झाला. या देवीच्या डोळ्यावर कायम पट्टी असायची, याचा अर्थ न्यायदेवी नेहमी निष्पक्ष राहून न्याय करेल. कोणाला पाहून न्याय करताना निर्णय एकाच्या बाजूने दिला जाऊ शकतो यासाठी ही पट्टी बांधण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!