काँग्रेसला गळती? दोन आमदार सोडणार काँग्रेसचा हात? काँग्रेसला करणार रामराम.. काय आहे कारण?
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l क्रॉस ओट्टींग केल्याप्रकरणी काँग्रेसच्या आमदारांवर पक्षान कारवाई चा बडगा उगारला आहे. सात काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस ओट्टिंग केल्याचं उघड झाले आहे. मात्र कारवाई होण्या पूर्वीच काँग्रेसचे दोन आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान पक्षानं तिकीट नाकारल्यास स्थानिक नेते घेतील तो निर्णय मान्य असल्याचे सांगत आमदार हिरामण खोसकरानी आपली भूमिका स्पष्ट केली.
दोषी आमदारांवर कारवाई होणार
आम्ही अक्शन मोडवर असल्याचं नाना पटोले यांनी सांगितले.मात्र कोणत्या प्रकारची कारवाई होणार हा हायकामांड चा निर्णय राहील असेही पटोले यांनी सांगितले.
विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे सात आमदार फुटल्याचे समोर आल्याने या सात आमदारांवर कांग्रेस कारवाई करणार आहे.या क्रॉस ओटिंग करणाऱ्या सात आमदारांमध्ये हिरामण खोसकर ,जितेश अंतापूरकर, मोहन हंबर्डे याच्या नावाची चर्चा आहे.या आमदारांनी प्रसार माध्यमांशी बोलताना क्रॉस ओटिंग केलं नसल्याच् सांगितलं.त्यातच काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजप नेते संजय उपाध्याय यांची शनिवार रोजी भेट घेतल्याचं सांगितलं जातंय.तसेच त्यांनी भाजप नेते अशोक चव्हाण याचीही भेट घेतली. तसेच रविवार रोजी हिरामण खोसकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या सर्व पाश्र्वभूमीवर हे आमदार काँग्रेसचा हात सोडून रामराम करणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर रंगू लागली आहे.