गौप्यस्फोट ; ठाकरे गटाचे आमदार आमच्या संपर्कात, मोठ्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच सत्ताधारी महायुतीच्या गोटात सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय घडामोडींना वेग आला असताना शिंदे शिवसेना गटाचे नेते उदय सामंत यांनी मोठा गौप्यस्फोट करत राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा सामंतांनी केला आहे. त्या आमदारांना केव्हा व कसा प्रवेश द्यायचा हे एकनाथ शिंदेच ठरवतील. तसेच त्या आमदारांची नावे जाहीर करणार नसून वेळेवरच त्यांची नावे जाहीर होतील असेही शिंदे शिवसेना गटाचे नेते उदय सामंत यांनी म्हटले आहे.
दावा करताना उदय सामंत यांनी असेही म्हटले आहे की, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. ठाकरे गटाकडे २० आमदार आहेत. त्यातील १७ ते १८ आमदार निकाल लागल्याच्या रात्रीपासूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला आहे.