भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

बिबट्याचा बालकावर हल्ला,सात वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू

यावल तालुक्यातील घटना

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l यावल तालुक्यात बिबट्याने हल्ला केल्याने सात वर्षीय बालक गंभीर जखमी होऊन त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील साकळी जवळील मानकी शेत शिवारात नदीकाठी  घडली. या घटनेने परिसरात मोठी  घबराट निर्माण झाली आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, आज ६ मार्च गुरूवार रोजी यावल तालुक्यातील साकळी गावा जवळच्या मानकी शिवारातील पाटचारी जवळील किनगाव येथील केतन सुरेश चौधरी यांच्या  गट क्र ४७२ या शेतात पेमा बुटा सिंग बारेला  यांचा मुलगा  केश्या पेमा बारेला वय ७ वर्ष. यांचेवर. दुपारी २ वाजेच्या सुमारास अचानक बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. त्यात केश्या  बारेला हा गंभीर जखमी होऊन जागीच त्याचा मृत्यू झाला. आरडाओरड केल्याने  शेतात काम करणाऱ्या स्त्री-पुरूषांनी ही घटना बघितल्याने त्यांनीही मोठा आरडा-ओरड केल्यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला.

या घटनेची माहिती यावल वन विभागाला देण्यात आली असता यावल वन विभागाचे उपवनसंरक्षण जमीर शेख, वन परिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिसर पिंजून काढला. नंतर मात्र बिबट्या दिसून आला नाही. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याला पिंजरा लाऊन पकडण्याची मागणी आता परिसरातून केली जात आहे.

दरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घडलेल्या दुर्देवी घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. तसेच वन्यप्राण्याच्या हल्यात मृत्यू झाल्यास राज्य शासनाकडून तात्काळ १० लाखाची मदत दिली जाते. त्या संदर्भातील कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!