यावल तालुक्यात बिबट्याचा वावर, बिबट्याची तीन पिल्ले आढळल्याने भीतीचे वातावरण,मात्र वनविभाग म्हणतं….
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l यावल तालुक्यातील यावल शहरापासून जवळच असलेल्या सावखेडासिम या गावा जवळून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी जंगल शिवारातील उसाचे शेतात ऊसतोड मजुरांना तीन बिबट्याची पिल्ले आढळून आल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावल तालक्यातील सावखेडा सीम येथील सुनील राजाराम बडगुजर यांचे सावखेडा शिवारातील उसाचे शेतात सकाळी जामनेर तालुक्यातील ऊस तोड मजूर गोपीचंद कृष्णा जाधव आणि संजय बद्री राठोड (राहणार दिए तांडा तालुका जामनेर ) यांचे सह आणखी काही
ऊसतोड मजूर ऊस तोडणी साठी गेले असता. त्यांना तीन बिबट्याची पिले दिसून आले. त्यांना बघून बिबट्याची पिले उसाचे क्षेत्रात आत मध्ये पळून गेले. पिल्ले आहेत म्हणजेच त्यांचे सोबत कुठेतरी बिबट्या मादी सुद्धा असणारच. त्या ठिकाणी मासाचे भक्षण केले असल्याचेही स्पस्ट दिसत असल्याने या मुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
बिबट्याच्या धाकाने मजुरांनी भित भित ऊसतोड केली. मात्र मजुरांजवळ त्याचे कुटुंब असून त्यात त्यांची लहान लहान मुळे बाळे असल्याने ते घाबरून गेल्याने ते ऊस तोडणी चे काम सोडून उर्वरित ऊस न तोडता निघून जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतमालक सुनील बडगुजर यांनी वन विभागाला याबाबतची सूचना केली असता पश्चिम क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दुपारी घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत
दरम्यान, वन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी सावखेडासिम या ठिकाणी सातपुडा पर्वताच्या शिखरावर पायथ्याशी असलेल्या जंगल शिवारातील शेतात मिळून आलेले तिन प्राण्यांचे पिल्लू हे बिबट्याचे नव्हे तर रानमांजरीचे पिल्लू असल्याची माहीती संपुर्ण चौकशी अंती वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल भिलावे यांनी दिली.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा