रावेर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
गोलवाडे , ता. रावेर, मंडे टु मंडे न्युज, जीवन महाजन l
रावेर तालुक्यातील गोलवाडे गावात बिबट्याने धुमाकूळ घातल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याने एका बकरीची शिकार केल्याची घटना घडली,
मिळालेल्या अधिक माहिती अशी की, गाव परिसरात बिबट्याचा वावर वाढत असून गावाजवळ राहणाऱ्या सुपळाबाई झेंडू जैतकर यांच्या घराबाहेर बांधलेली बकरी बिबट्याने फस्त केली. गावात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे गोलवाडे गावातील व परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असूनबया संदर्भात गावकऱ्यांनी वन विभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
रावेर वनविभागाचे वनपाल रविंद्र सोनवणे हे टीम सह घटनास्थळी दाखल होत बिबट्याचे पगमार्ग घेतले. त्यांनी ग्रामस्थांना सावध राहण्याचे आणि रात्री एकटे शेतात न जाण्याचे आवाहन केले आहे. गोलवाडे गावात बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेता वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
