यावल तालुक्यात पुन्हा बिबट्याचे दर्शन, बकरी व कुत्रा फस्त, शेतकरी, मजुरांमध्ये दहशत
यावल,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | यावल तालुक्यात सध्या गाव वस्ती कडे बिबट्याचा संचार वाढला आहे. यावल तालुक्यातच गेल्या काही दिवसांपूर्वी लहान बालकाला उचलून नेले. काहींवर हल्लाकेल्याच्या घटना घडल्या. नुकत्याच काही दिवसांपूर्वी यावल तालुक्यातील पाडळसा शेत शिवारात त्याच प्रमाणे डोंगर कठोरा भागातील मोहाडी शेत शिवारात बिबट्या आढळून आला. आणि आता तेथून जवळच असलेल्या तालुक्यातील दहिगाव शिवारात पुन्हा बिबट्याचे दर्शन झाले असून मेंढपाळांची बकरी व कुत्रा लांबविण्याची घटना दि.२ रोजी घडली. यामुळे परिसरात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबटे नक्की किती ?
दहीगाव करांमध्ये पुन्हा बिबट्या बाबत भिती निर्माण झाली आहे. दि.२ रोजी जनार्दन तुकाराम महाजन यांचे शेत गट नंबर ११२ दहिगाव शिवार मध्ये यादव कुटुंब त्यांचा फळ घेऊन मुक्कामी आहेत प्रत्येक्ष दर्शनी मेंढपाळांनी बिबट्या झाडावरून उतरताना बघितला त्याने लागलीच त्यांच्या कुत्र्यावर हल्ला करून त्याला लंपास केला तर काही वेळातच आहे बाळू रमेश माळी यांचे शेतातही मेंढपाळ उतरलेले आहेत तेथून १ बकरी लंपास केल्याचे प्रत्यक्ष दर्शनी बाळू माळी व मेंढपाळांनी बघितले वन विभागाला याबाबतच्या सूचना दिल्यानंतर तत्काळ त्यांनी घटनास्थळी भेट दिली.
घटनास्थळी बिबट्याचे ठसे सुद्धा उमटलेले आहेत मात्र ते ठसे तळसाचे आहेत असे वनविभागाचे म्हणणे आहे. मात्र तडस झाडावर चढत नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे, तो बिबट्याच आहे आम्ही प्रत्यक्ष बघितले आहे. असे शेतमालक बाळू माळी व जनार्दन महाजन यांनी सांगितले आहे.
घडलेल्या प्रकाराने दहिगाव परिसरात पुन्हा शेतकऱ्यांमध्ये , नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली असल्याने धास्तीने सध्या शेतकऱ्यांना मजूर मिळणे कठीण झालेले आहे. त्यातच बिबट्याची दहशत असल्याने आता मजूर धास्तावले आहेत. या प्रकाराने वनविभागावर प्रश्न उभे राहिले आहे. यावल पश्चिम वन क्षेत्रपाल यांनी तत्काळ कार्यवाही करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.