यावल

बिबट्या शेत शिवारात तर हरिणाचा यावल शहरात मुक्त संचार

यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |यावल शहरात रात्रीच्या वेळेला हरिण खुलेआम फिरत असताना
सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले आहे.

सोमवार दि.२४ मार्च रोजी रात्री यावल शहरात खिर्नीपुरा, नगीना चौक परिसरात रात्री गल्लीत मुले रस्त्यावर बॅडमिंटन खेळत असताना खेळणाऱ्या मुलां जवळून हरिण पळत गेल्याचं मुलांनी बघितले. हे दृश्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये टिपले गेले आहे.

यावल पूर्व आणि पश्चिम वन क्षेत्राच्या कार्यक्षेत्रात बिबट्या शेती शिवारात बिनधास्त फिरत असल्याच दिसून आलं. या सोबत आता हरिणसुद्धा रात्रीच्या वेळेस यावल शहरात फिरताना दिसून आले आहे. जंगल कमी होत असल्याने जंगली प्राणी आता गाव शहराकडे फिरत असल्याच दिसून येत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!