लाईनमन परेश चौधरी यांनी पटकावला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धत तिसरा क्रमांक
बलवाड़ी, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज. आशीष चौधरी | सावदा विभागातील मोठे वाघोदा येथे महावितरण कंपनीत कार्यरत असलेले परेश डीगंबर चौधरी यांनी महाराट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित कोल्हापूर (46th ऑल इंडिया गेम्) महाडिस्कोम मार्फत आयोजित राष्ट्रीय आंतर परिमंडळ क्रीडा स्पर्धेत 800मी धावणे पुरुष या क्रीडा प्रकारात सहभाग नोंदवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
हा कार्यक्रम दि. 17/4/25 ते 19 /4/25 शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर येथे पार पडला या स्पर्धेत 13 राज्य हरीयाना पंजाब गुजरात महाराष्ट्र मध्यप्रदेश राजस्थान इ सहभागी झाले होते.श्री जिग्नेश टि. रे. साहेब अध्यक्ष तथा सरचिटणीस नरेश कुंभार तथा कोषध्यक्ष श्री ललित गायकवाड.. अध्यक्ष आयोजन समिती वं मान्यवरांच्या हस्ते परेश चौधरी यांना सन्मान पत्र ट्रॉफी आणि रोप्य पदक देऊन गौरवण्यात आले.सर्वत्र चौधरी यांचे कौतुक होत आहे