भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

महाराष्ट्राच्या संभाव्य मंत्र्यांची यादी, कोणाची वर्णी? कोणाला डच्चू?

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l विधानसभेचा निकाल लागला, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या महायुतीला राज्यात मोठं यश मिळाल्याने आता मुख्यमंत्रि‍पदा पासून मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युलावर देखील महायुतीमध्ये चर्चा सुरु झाली आहे. त्यात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहेत.

विधानसभेत सर्वाधिक आमदार भाजपचे निवडून आले आहेत.त्या नुसार भाजपला सर्वाधिक २० ते २५ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता असून त्या खालोखाल शिवसेना शिंदे गटाला १० ते १२ तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला ७ ते ९ मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. या प्रमाणे अंदाजित महायुतीचा मंत्रिमंडळ पद वाटपाचा फॉर्म्युला असू शकतो.

त्यातच भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे.

भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-
देवेंद्र फडणवीस – मुख्यमंत्री पदासाठी दिल्लीतील वरीष्ठ नेत्यांची पसंती
गिरीश महाजन – सरकारचे संकटमोचक व उत्तर महाराष्ट्रात भाजपला लोकसभा व विधानसभेत चांगलं यश मिळवून दिलं
रविंद्र चव्हाण – पडद्यामागून काम करणारे कोकणातील व्यक्तीमत्व,
मंगलप्रभात लोढा – मुंबई शहरातून भाजपचा मोठा चेहरा आणि गुजराती, जैन समाजाच्या दृष्टीनं महत्त्वाची व्यक्ती
चंद्रशेखर बावनकुळे – विधानसभेत मोठं यश
आशिष शेलार – मुंबई अध्यक्षाच्या दृष्टीनं निवडणुकीत चांगली कामगिरी
नितेश राणे – हिंदूत्व पोस्टर बाॅय म्हणून राणेंची ओळख, भाजपसाठी हिंदुत्वाचा चेहरा, कटेंगे तो बटेंगे आणि एक है तो सेफ है चा नारा पुढे नेण्यात मोठं काम
शिवेंद्रसिंहराजे भोसले – पश्चिम महाराष्ट्रातला भोसले घराण्याचा चेहरा
राहुल कुल – दौंडमधून तिसऱ्या विजयी
माधुरी मिसाळ -२००९ पासून पर्वती मतदारसंघातून आमदार
संजय कुटे – पश्चिम विदर्भातील भाजपचे फडणवीस यांचे निकटवर्तीय, संघाच्या फळीतील चेहरा
राधाकृष्ण विखे पाटील – नगर जिल्ह्यातील चेहरा
गणेश नाईक – नवी मुंबईतील भाजपचा मोठा चेहरा
पंकजा मुंडे – ओबीसी आणि मराठवाड्यातील चेहरा
गोपीचंद पडळकर – जतमधून आमदार, धनगर चेहरा

यांना डच्चू मिळण्याची शक्यता-
विजयकुमार गावित
सुधीर मुनगंटीवार

शिंदे शिवसेना गटाची संभाव्य मंत्री-
उदय सामंत
शंभूराज देसाई
गुलाबराव पाटील
संजय शिरसाट
भरत गोगावले
प्रकाश सुर्वे
प्रताप सरनाईक
तानाजी सावंत
राजेश क्षीरसागर
आशिष जैस्वाल
निलेश राणे

यांना डच्चू ?
दीपक केसरकर
अब्दुल सत्तार
संजय राठोड

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-
धनंजय मुंडे
अदिती तटकरे
अनिल पाटील
हसन मुश्रीफ
धर्मराव बाबा अत्राम
अजित पवार
छगन भुजबळ

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!