उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील काही जिल्ह्यात वादळी पाऊस, तर येथे अतिमुसळधार पावसाचा अलर्ट
मुंबई,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे की,अरबी समुद्रात बंगालच्या उपसागरासह मोसमी वारे जोरात वाहत असून त्यांचा वेग वाढला असल्याने कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याने राज्यात पाऊस वाढणार आहे.
त्या मुळे मोसमी पाऊस वेगाने सक्रिय झाला आहे. ज्यामुळे हवामान विभागानं राज्यात पुढील दोन ते तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. ज्यापैकी पुणे, सातारा, घाटमाथा परिसराला आज अतिवृष्टीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यात मराठवाडा वगळता बहुतांश भागात २९ ऑगस्ट गुरूवार पर्यंत पाऊस वाढणार असल्याचा इशारा दिला आहे.
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह राज्यातील काही जिल्ह्यात आज वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा इथं पावसाची शक्यता आहे.
काही जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. तर अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे. नंदूरबार, नाशिक, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यातील पुणे, सातारा – येथे रेड अलर्ट देण्यात आला असून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर जळगाव, नंदुरबार, नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे,अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, सातारा – येथे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.