LOC च्या बाजूने उरी सेक्टरमध्ये संशयास्पद हालचाली कॅमेऱ्यात कैद; लष्कर लक्ष ठेवून !
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)। एकीकडे लडाखमध्ये भारत – चीन सीमेवर दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये चमकम उडत असताना दुसरीकडे बारामुल्ला जिल्ह्यातही उरी सेक्टरमध्ये भारतात घुसखोरी करणाऱ्या संशयास्पद हालचाली पाहायला मिळाल्या आहेत. भारतीय लष्कराच्या चिनार कॉप्सने एएनआयला दिलेल्या माहितीनुसार ३० ऑगस्ट रोजी रामपूर येथील लाईन ऑफ कंट्रोल (LOC) च्या दिशेने भारतीय सीमा ओलांडणाऱ्या हालचाली कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या आहेत. जम्मू – काश्मिरच्या खोऱ्यात उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैनिक तसेच दहशतवाद्यांच्या हालचालींवर भारतीय लष्कर लक्ष ठेवून आहेत.
ज्या भागात घुसखोरीचा प्रयत्न केला जात आहे त्या कुंपणाच्या पुढे गावे आहेत. नियंत्रण रेषेच्या बाजूने शस्त्राचा वापर करण्याची वेळ येऊ न देणे ही रणनिती असू शकते. ज्या ओजीडब्ल्यू किंवा दहशतवाद्यांकडून त्यांच्या दहशतवादी कारवायांसाठी वापरल्या जातात, अशी माहितीही लष्कराने दिली आहे. या प्रयत्नांमधून पाकिस्तान लष्कराच्या सक्रियतेने जम्मू-काश्मीरमध्ये शस्त्रे घुसण्यासाठी पाक आधारित दहशतवादी गटांची होणारी हतबलता उघडकीस आली आहे. या सर्व गैरप्रकारांना मजबूत पाळत ठेवणे आणि नियंत्रण रेषांचे वर्चस्व कायम राखणे याचे आळा घालणे शक्य होईल, असेही लष्कराने म्हटले आहे.