ब्रेकिंग : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढणार, महायुतीतील घटक पक्षप्रमुखाची घोषणा
पुणे, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l “लोकसभा आणि विधानसभा आपण महायुतीमध्ये एकत्र लढणार आहोत. पण
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या आपापल्या पक्षाने आपापल्या ताकदीवर लढवायच्या आहेत अशी घोषणा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केलं.
रविवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अजित पवार यांनी सांगितले की,”लोकसभा आणि विधानसभा आपण महायुतीमध्ये एकत्र लढणार आहोत. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या आपापल्या पक्षाने आपापल्या ताकदीवर लढवायच्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी वॉर्ड, प्रभाग, गटात व्यवस्थितपणे काम करावं. आपण योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या तर ते विसरणार नाहीत. असंही पवार या वेळी म्हणाले.