भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

भुसावळ च्या तरुणाला शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखून ४० लाखात फसवणूक

भुसावळ, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l भुसावळ शहरातील तरुणाला शेअर ट्रेडिंग चे वेळोवेळी आमिष दाखून त्याची तब्बल ४० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या तरुणाला जळगाव येथील सायबर पोलिसांनी हरियाणा राज्यातून अटक केली.

भुसावळ शहरातील राकेश पांडे या तरुणाला शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून वेळोवेळी ४० लाख रुपये घेऊन अज्ञात आरोपींची फसवणूक केली होती. याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशनला दि. १४ मार्च २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणी सायबर पोलिस तपास करीत होते.

संशयित आरोपीची पोलिसांना माहिती मिळाली. संशयित समीम लियाकत अली मोहम्मदपूर. वय २८, रा. कटरा बाजार ता. कर्नलगंज जि. गोंडा, उत्तर प्रदेश. हा हरियाणा राज्यातील फरिदाबाद येथे पोलीस कोठडीत होता. तेथून त्याला ताब्यात घेऊन जळगाव येथे आणण्यात आले.

सदर संशयित समीम लियाकत अली याने फरिदाबाद येथे ५३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी देखील गुन्हा दाखल आहे. यापूर्वी त्याने अनेक सायबर गंडे घातल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. सदर कारवाई निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेकॉ प्रशांत साळी, हेकॉ हेमंत माळी, अरविंद वानखेडे, नितीन भालेराव यांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!