अमळनेरक्राईम

कर्मचाऱ्यांनीच घातला फायनान्शियल बँकेला ११ लाखांचा गंडा

अमळनेर, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l कर्मचाऱ्यांनी बँकेच्या कर्जाची रक्कम वसूल करून ही रक्कम बँकेत जमा न करता ती परस्पर विल्हेवाट लाऊन अमळनेर शहरातील भारत फायनान्शियल इन्कुलुजम लिमिटेड या बँकेला दोघा कर्मचाऱ्यांनी ११ लाख १५ हजारांचा गंडा घातला.

गेल्या दीड वर्षापासून उमाकांत आधार विसावे. रा. झुरखेडा, ता. धरणगाव. व मयूर मिठाराम बडगुजर रां. सुंदरगडी, चोपडा हे दोन्ही कर्मचारी अमळनेर शहरातील भारत फायनान्शियल इन्कुलुजम लिमिटेड या बँकेत
वसुली अधिकारी/ फील्ड ऑफिसर म्हणून काम करीत असून ११ ऑगस्ट २०२३ ते दि. ५ एप्रिल २०२४ या दरम्यान कंपनीचे कर्मचारी उमाकांत आधार विसावे यांनी एकूण १२२ कर्जदारांकडून ८ लाख ९७ लाख ७७४ रुपयांची कर्जवसुली केली. तर मयूर मिठाराम बडगुजर याने २२ कर्जदाराकडून २ लाख १५ हजार ७६३ रुपयांची वसुली केली. ही वसुली त्यांनी बँकेत जमा न करता दोघांनी मिळून एकूण ११ लाख १३ हजार ५१० रुपयांचा अपहार करत बँकेला गंडा घातला.

या संदर्भात बँकेचे व्यवस्थापक अमोल सुरेश मराठे. शिवपार्वती कॉलनी, बसस्टॅन्डच्या पाठीमागे. अमळनेर. यांनी अमळनेर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली होती. फिल्ड ऑफिसर आरोपी उमाकांत आधार विसावे. रा. झुरखेडा, ता. धरणगाव. व मयूर मिठाराम बडगुजर. रा. सुंदरगडी, चोपडा यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!