LPG सिलेंडर महागला, महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना महागाईचा झटका
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी LPG सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. १ डिसेंबरपासून तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात सलग पाचव्या महिन्यात वाढ केली आहे.
LPG सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात असल्याने व्यावसायिक क्षेत्रावर मोठा भर पडतो. दुकाने,रेस्टॉरंट, कॅफे, आदी लघु उद्योग यावर भार पडल्याने हॉटेलातील जेवण व इतर सेवा महाग होण्याची शक्यता वर्तविली जातेय.
व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत प्रति गॅस सिलेंडर सरासरी १८ रुपयांनी वाढली आहे. मुंबईमध्ये १६.५० रुपयांनी गॅस महागलाय. मात्र घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.
घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत अखेरीस १०० रुपयांनी कपात करण्यात आली होती. मात्र मागील पाच महिन्यापासून व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे.
कंपन्यांनी आज १ डिसेंबर पासून १९ किलो वजनाच्या व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. मुंबईत एलपीजी सिलिंडरच्या दरात १६.५० रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईत आजपासून गॅस सिलिंडर १७७१ रुपयांना मिळणार आहे.