भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

लोकसभा निवडणूक निकालापूर्वीच एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l लोकसभा निवडणूक निकालापूर्वीच दिलासा देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे.एलपीजी सिलिंडर स्वस्त झाला आहे. सलग तिसऱ्या महिन्यात गॅसचे दर घसरले आहेत.

लोकसभा २०२४ निवडणुकीच्या शेवटच्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी शनिवारी म्हणजेच १ मे रोजी मतदान होत आहे.
४ जून रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल, या निकालाआधीच भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी १ जून रोजी सिलिंडरच्या नव्या किंमती अपडेट्स केल्या आहेत

जून महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ७० ते ७२ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे सलग तिसऱ्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडर स्वस्त झाला आहे. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

व्यावसायिक सिलिंडर झाला स्वस्त
IOCL कडून मिळालेल्या माहितीनुसार, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडर ६९.५ रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्यानंतर दोन्ही महानगरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती अनुक्रमे १६७६ आणि १६२९ रुपये झाल्या आहेत.

घरगुती गॅस सिलिंडरचे नवे दर
घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. ९ मार्च घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत शेवटचा बदल झाला होता. त्यावेळी एलपीजीच्या किमतीत तब्बल १०० रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यानंतर देशाची राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ८०३ रुपये इतकी झाली. मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरचा ८२९ रुपये, राज्यात इतर ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडर ८०३ रुपये आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!