जामनेरराजकीय

जामनेरातून फुंकली मा.जि.प. अध्यक्षांनी तुतारी, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश

जामनेर, जि.जळगाव. मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l अखेर जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. या वेळी त्यांनी खांद्यावर तुतारी चिन्ह असलेला झेंडा घेऊन जल्लोष केला.

होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात दिलीप खोडपे हे निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षातर्फे त्यांना उमेदवारी देण्याबाबत हालचाली सुरू असल्याचे नीच्चीत झाल्याचे सांगितले जात आहे.

शनिवार दि. २१ सप्टेंबर रोजी जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळावा पार पडला. या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतीश पाटील, माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी आ. अरुण पाटील, अमळनेरचे माजी आमदार बी. एस. पाटील यांच्यासह जामनेर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!