भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

भाजपचा आपल्याला पाठिंबा, लागेल त्या मदतीचा शब्द दिलाय– एकनाथ शिंदेंचा व्हिडिओ व्हायरल

गुवाहाटी/मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा नवा व्हिडीओ समोर आलाय. यामध्ये भाजपचा आपल्याला पाठिंबा असल्याचं ते म्हणत आहेत. कुठेही काही लागलं तर कमी पडणार नाही, असा शब्द भाजपने आपल्याला दिल्याचं एकनाथ शिंदे सांगत आहेत. आपण फक्त एकजुटीने राहू. विजय आपलाच आहे, असा विश्वासही त्यांनी बंडखोर आमदारांना दिला आहे. भाजप एक राष्ट्रीय शक्ती आहे. राष्ट्रीय पक्ष असल्याने बलवान आहे. त्यांनी पाकिस्थानला ही धडा शिकवलाय. आपल्याला मदतीचा त्यांनी शब्द दिलाय. तुमच्या पाठीमागे आमची पूर्ण शक्ती असल्याचं भाजप नेतृत्वाने आपल्याला सांगितलं आहे. त्यामुळे आता आणण एकजूट राहण्याची आवश्यकता आहे, असं एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांना मार्गदर्शन म्हणाले.

अखेर एकनाथ शिंदे यांचा भाजपसोबत जाण्याचा निर्णय, बंडखोर आमदारांना संबोधित करताना शिंदेंचं वक्तव्य. एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी आज मेघालयचे मुख्यमंत्री पोहोचले होते. भाजप आमदार संजय कुटे आणि मोहित कंबोज सूरतपासून सोबत आहेत. एकनाथ शिंदे समर्थक आमदार थांबलेल्या सूरत आणि गुवाहाटी ही दोन शहरं भाजपशासीत राज्यातील असल्यानं भाजप आता थेट सक्रिय होऊन ठाकरे सरकार पाडण्यासाठी सक्रिय होणार का हे पाहावं लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!