राज्यात दहावी परीक्षेचा एकूण ९५.३० टक्के निकाल; यंदाही कोकण विभाग पुढे !
मुंबई (वृत्तसंस्था)। राज्यातील नऊ विभागीय मंडळातंर्गत घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल ९५.३० टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.७७ टक्के तर औरंगाबाद विभागाचा निकाल ९२ टक्के लागला आहे. मुंबईचा निकाल ९६.७२ टक्के लागला आहे. तर नाशिकचा निकाल ९३.७३ टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा राज्याच्या निकालात १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली असून, मुलींचा निकाल ९६.११ टक्के तर मुलांचा निकाल ९३.९० टक्के लागला आहे. यंदा परीक्षेला राज्यभरातून १५ लाख ७५ हजार १०३ विद्यार्थी बसले होते. त्यातील १५ लाख १ हजार १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.