भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

“या” योजनेतून मोफत उपचार, रुग्णालयाने शुल्क आकारल्यास ५ पट दंड आकारणी !

मुंबई (वृत्तसंस्था)। महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजनेतील रुग्णालयात मोफत उपचार होतील. यासंदर्भात विशेष आदेश जारी करण्यात आले आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय.  उपचारासाठी पैसे घेतले तर ५ पट दंड लावण्याचा, परवाना रद्द करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचेही ते म्हणाले. महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजनेतून श्वसनासंबंधित २० आजारांसाठी मोफत उपचार होणार आहेत. 

दरम्यान, या योजनेत श्वसनासंबंधी २० प्रकारच्या आजारांचा समावेश आहे. यामध्ये ऑक्सिजनची पातळी ९४ पेक्षा कमी झालेल्या सर्व रुग्णांना दहा दिवस मोफत उपचार घेता येणार आहे. या योजनेनुसार कोरोना उपचार देणाऱ्या रुग्णालयांनी मोफत देणे अपेक्षित आहे. मात्र, काही रुग्णालये शुल्क आकारत असल्याचे समोर आले आहे. तर काही रुग्णालये कोरोनाबाधितांना उपचार देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे आता हे प्रकार थांबवण्यासाठी उपचार देण्यास नकार देणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी. योजनेत समाविष्ट कोरोना उपचारासाठी शुल्क रुग्णालयांवर पाचपट दंड, योजनेतून रुग्णालयांना वगळणे, रुग्णालयावर गुन्हा दाखल करणे अशी कठोर पावले उचलण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शिवाय, जास्तीत जास्त खासगी कोरोना रुग्णालयांना योजनेत समाविष्ट करून रुग्णालयांच्या कामकाजावर लक्ष देण्याचे आदेशही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!