भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप ? अजित पवार सरकार मध्ये सामील होण्याची शक्यता

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा |महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार वेगळी चूल मांडणार असल्याची बातमी आहे. अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार अशी माहिती आहे. अजित पवार यांच्यासोबत 30 आमदार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे एकूण 9 आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील. संध्याकाळी 6 वाजता हा शपथविधी होईल.

राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रात एकूण 54 आमदार आहेत. त्यातल्या 30 ते 40 आमदारांचा अजित पवार यांना पाठिंबा आहे. छगन भुजबळ हे अजित पवारांसोबत कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतील, अशी माहिती आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्याध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची निवड केली होती. ते सुद्धा अजित पवारांसोबत आहेत.

सध्या प्रफुल्ल पटेल, छनग भुजबळ आणि धनंजय मुंडे हे राजभवनात असल्याची माहिती आहे. राजभवनात शपथविधीची तयारी सुरु आहे.

राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता असून अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  अजित पवार राजभवनात दाखल झाले आहेत.  बातमी अपडेट होत आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!