Breaking : राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट रात्री १२, दुकाने ११ पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई, मंडे टू मंडे वृत्तसेवा : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने हळूहळू सर्व निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने राज्यातील उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. 22 ऑक्टोबरपासून आपण चित्रपटगृहे, नाट्यगृहे यांनाही सुरू होत आहेत. तर उपाहारगृहे आणि दुकाने यांची देखील वेळा वाढवून देण्याची सातत्याने मागणी होत होती, ही मागणी लक्षात घेता राज्य सरकारने राज्यातील रेस्टॉरंट रात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. यासोबतच इतर दुकाने रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य सरकारने मुभा दिली आहे. यासोबतच त्यासंदर्भातील कार्यपद्धती आणि मार्गदर्शक सूचना जाही करण्यात आल्या आहेत.
राज्य आता हळूहळू अनलॉकच्या दिशेने जात आहे. राज्यात याआधी हॉटेल्स,रेस्टॉरंट्स १० वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी होती. आता टास्क फोर्स सोबत झालेल्या बैठकीनंतर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स १२ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे. तसंच, सर्व प्रकारची दुकाने रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय, अम्युझमेंट पार्क देखील २२ ऑक्टोबरपासून खुली होणार आहेत. यासाठीच्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. हॉटेल्स, रेस्टॉरंट्समधील कर्मचारी तसंच ग्राहकांचं लसीकरण आवश्यक आहे. फेस मास्क तसंच, सॅनिटायझरचा वापरही अनिवार्य आहे.