भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

राज्याच्या गृहविभागाचे उपसचिव यांना ईडीचे समन्स !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित कथित मनी लाँडरिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) महाराष्ट्रातील गृह खात्याचे उपसचिव कैलास गायकवाड यांना देखील आता समन्स बजावले आहे. कैलास गायकवाड यांना आज (30 सप्टेंबर) चौकशीसाठी एजन्सीसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता ईडीच्या चौकशीचा फेरा मंत्रलयातील बड्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्या १०० कोटींच्या वसुलीचे आरोप केले. तसंच, पोलीस अधिकारी आणि प्रशासनातील बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा देखील आरोप करण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर ईडीने गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांना समन्स बजावलं आहे. कारण पोलीस अधिकारी आणि प्रशासनातील बदलाच्या आदेशावर कैलास गायकवाड यांच्या स्वाक्षरीने हे आदेश निघायचे. त्यामुळे आज त्यांना ईडीने चौकशीसाठी ईडी कार्यलायत उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!