भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

अमरावतीत बंदला हिंसक वळण : कलम १४४ लागू, पोलिसांकडून अश्रूधूराचा वापर

अमरावती, प्रतिनिधी : त्रिपुरा दंगलीचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. राज्यातील अमरावतीत या पार्श्वभूमीवर जास्त हिंसक वातावरण झालेले दिसत आहे. कालपासून अमरावती शहरात प्रचंड दणाव आणि दशहतीचे वातावरण आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी अमरावतीत कलम 144 लागू केले आहे.

त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ काल समाजातील एक गटाने केलेल्या लूटमार, जाळपोळ, आणि तोडफोडीच्या घटनांचे पडसाद आजही दिसत आहे. आज सकाळी अमरातीत मोठ्या संख्येने जमावाने रस्त्यावर उतरत घोषणाबाजी केली. तर शहरातील राजकमल चौक परिसरातील एका टपरीलाही एका जमावाने आग लावली. या टपरीतील सामान आधी काढून घेण्यात आले होते. मात्र भर बाजारातील या टपरीला आग लावल्याने परिसरात धूर आणि आगीचे मोठे लोट उठताना दिसत होते. दरम्यान हा प्रकार थांबवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूराचा वापर केला. त्यानंतर जमाव पांगला गेला.

दरम्यान, अमरावतीत दोन गटातील वादाला हिंसक वळण मिळाल्यामुळे शहरात दंगानियंत्रक पथके तैनात करण्यात आली आहेत. शहरातील काही ठिकाणी जमाव हिंसक झाला असला तरीही उर्वरीत शहरात तणावपूर्ण शांतता आहे. कालपासून अमरावती शहरात सुरु असलेल्या जाळपोळ आणि हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात 144 कलम लागू केले आहे. यानुसार पोलिसांनी जमावबंदी अर्थात कर्फ्यू लागू केला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!