भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

बदलापूर येथील चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी दि.२४ रोजी महाराष्ट्र बंद ची हाकया

मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l बदलापूर येथील शाळेत एका साडे तीन व एका सहा वर्षीय चीमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी बदलापूरकरांनी बदलापूर रेल्वे स्टेशनवर सुमारे ९ ते १० तास रेल रोको आंदोलन करून संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले .आंदोलक रेल्वे ट्रॅक वरून हलत नव्हते, आरोपी नराधमाला फाशी द्या अशी मागणी आंदोलक करीत होते.  या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. आता विरोधी पक्षांनी देखील या घटनेच्या निषेधार्थ येत्या २४ रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. आघाडीचे सगळे पक्ष या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. बदलापूर प्रकरणी महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.

या बंद मध्ये महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्ष सहभागी होणार आहेत. बदलापूर प्रकरणी महाविकास आघाडीच्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. नाना पटोले आजच बदलापूर येथे जाऊन घटनास्थळी भेट देणार आहे.

दरम्यान बदलापूर इथं दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. पुणे, जळगाव, सांगलीत या घटनेच्या निषेधार्थ आंदोलनं करण्यात आली. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं आंदोलन झालं.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने हे आंदोलन केलं.पुण्यातील गुडलक चौकामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात आणि बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पवार गटाचं आंदोलन झालं. सांगलीतही राष्ट्रवादी शरद पवार गटाने आंदोलन केलं आहे. ठाकरे गटाकडूनही आंदोलन करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!