तर कोणत्याही परिस्थितीत राजीनामा देणारच- उदयनराजे भोसले
मुंबई (वृत्तसंस्था)। भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. मराठा आरक्षण सरकारने केलं तर ठीक, अन्यथा राजकारणाला रामराम करणार आणि राजीनामा देणार, असे उदयनराजे यांनी सांगितले. तर “मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा देण्याची वेळ आली तर कोणत्याही परिस्थितीत मी राजीनामा देणारच. मग फक्त मराठा नाही तर ज्यांच्यावर अन्याय होत असेल त्या सर्वांसाठी मी राजीनामा देणार. जर काही होत नसेल तर पदावरुन राहून काय उपयोग,” असेही उदयनराजे एबीपी माझाशी बोलताना म्हणाले.
सर्वांना न्याय मिळत असताना मराठा समाजाने वंचित का राहावं ? अशी विचारणाही केली. तर न्यायालयाने सर्वांना समान अधिकार द्यावेत. न्याय मिळाला नाही तर उद्रेक होणार हे स्वाभाविक आहेत. मराठा आरक्षणावर सरकारने काही केलं तर ठीक, नाहीतर राजकारणाला रामराम करणार, राजीनामा देऊन टाकणार. मी मनापासून बोलतो, मी कधी राजकारण केलं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तर मी देणारच. फक्त मराठा समाजासाठीच नाही इतर कोणावर अन्याय होत असतील तर त्यांच्यासाठीही लढणार. कोणावर अन्याय झाला आणि वेळ आली तर राजीनामा देणार. काय होत नसेल तर पदावर राहून काय उपयोग? असेही उदयनराजे म्हणाले.
“मराठा आरक्षणावरुन माझी अनेकांशी चर्चा सुरु असून यामध्ये राजकारण आणलं जाऊ नये. इतरांप्रमाणे मराठा समाजालाही न्याय मिळाला पाहिजे. ओघाने मी मराठा आहे, पण मला तेवढ्यापुरतं मर्यादित ठेऊ नका,” अशी विनंती उदयनराजेंनी केली आहे. “आरक्षण नाही मिळालं तर उद्रेक होईल याची जास्त भीती वाटते,” असं ते म्हणाले आहेत. तसेच“नेतृत्व कोणीही करावं. पण मुख्य समस्या सोडवली जाणं महत्त्वाचं आहे,” असं ते म्हणाले आहेत. पुढे ते म्हणाले की, “जे माझ्या मनाला पटतं ते मी करणार. मी राजकारणी नाही, राजकारण करणं आपल्याला पटत नाही. अन्याय जिथे होत असेल तिथे मी उतरणार”. यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त करताना असे सांगितले की, “माझी बांधिलकी लोकांशी आहे, पक्षाशी नाही. कोणताही पक्ष हा लोकांच्या जीवावर असतो. जे माझ्या बुद्धीला पटत नाही ते मी कधीच करत नाही, मग ते कोणीही असो. मला कोर्टाचा अवमान करण्याची इच्छा नाही. पण कोर्ट म्हणजे काय मला हे कळालंच नाही. कोर्ट म्हणजे तुमच्या आमच्यासारखी माणसंच असतात. निर्णय देताना त्यांनी मनाने विचार केला पाहिजे, त्यांनी सर्वांना न्याय दिला पाहिजे”, असेही ते म्हणाले.