भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

एकाच अ‍ॅम्ब्युलन्समध्ये तब्बल २२ मृतदेह कोंबले, महाराष्ट्रातील थरारक घटना

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

बीड (अरुण पालवे) : राज्यात कोरोनाची थैमान घालत असताना बीडमध्ये अत्यंत महाभयंकर आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एकाच रुग्णवाहिकेतून एक दोन नव्हे तर २२ मृतदेह कोंबून त्यांची वाहतूक केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. त्यामुळे केवळ बीडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे.

बीड अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कोरोनामुळे मृत झालेल्या तब्बल २२ मृतदेहांना एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात येत होते यावेळी रुग्णवाहिकेत अक्षरशः मृतदेह कोंबले होते. मृत झालेल्या रुग्णांना अशा पद्धतीने अंत्यविधीसाठी नेण्याचा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. रुग्णालय प्रशासनाकडे रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने एकाचवेळी अत्यंत वाईट अवस्थेत हे मृतदेह नेले जात होते. या घटनेमुळे मरण पावल्यानंतरही कोरोनाबाधितांचा नरक यातना संपत नसल्याचे दिसतेयं, यामुळे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय प्रशासनाविरोधात नागरिक संपात व्यक्त करत आहेत, जिल्हात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयांमध्ये मृतांचे अक्षरश: ठीग जमा होत आहे. यात अंबाजोगाई तालुक्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. रोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयांवर ताण निर्माण होत आहे. दरम्यान बाजूच्या तालुक्यातील कोरोना रुग्णांना स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय आणि लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटरमध्ये दाखल केले जात आहे. परंतु वाढत्या रुग्णसंख्येबरोबर मृतांचेही प्रमाण वाढले आहे. मात्र मृत्यूनंतरही शांती मिळण्याऐवजी कोरोना रुग्णांचा मृतदेहांची परवड सुरु असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!