हृदयद्राहक; स्वेटरच्या दोरीचा फास लागून ९ वर्षाच्या मुलाचा मृत्यू
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
बऱ्याचदा लहान मुलं खेळत असताना त्यांच्याकडे पालक गांभीर्याने पाहत नाही. मात्र, हीच चूक त्यांना आयुष्यभर मनाला सलते, अशीच एक धक्कादायक घटना सोलापूरमध्ये घडली आहे. या घटनेमुळे एका लहान चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोलापुरातील सांगोल्यात एक नऊ वर्षाचा चिमुरडा खेळत असताना त्याच्या स्वेटरची दोरी पलंगाच्या खुंटल्याला अडकली आणि गळ्याला फास लागून त्यात चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
सोलापुरातील सांगोला तालुक्यात माळीवस्ती येथे राहणारे जगन्नाथ शेंडे यांच्या मुलाला सध्या थंडीचे दिवस असल्याने स्वेटर घातले होते. मात्र, या स्वेटरनेच त्याचा जीव घेतल्याची घटना समोर आली आहे. सोहम स्वेटर घालून घरातील पलंगाच्या वरील बाजूस असलेल्या खुंडीशी खेळत होता. खेळत असताना अचानक त्याच्या स्वेटरची दोरी त्या खुंटल्यात अडकली आणि होत्याचे नव्हते झाले. सोहमच्या स्वेटरची दोरी खुंट्याला अडकली आणि फास लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, शेजारी राहणाऱ्या मित्रांनी त्याला खेळण्यास बोलवायला गेले त्यावेळी ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण माळीवस्तीत शोककळा पसरली आहे. तर त्याच्या आई-वडिलांवर दुखाचा डोंगर पसरला आहे. मुलगा खेळाच्या नादात जीवानिशी गेल्याने आईवडीलही पुरते कोसळून गेले आहेत.