भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

कोरोना वाढतोय, लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान ! कोरोनाच्या नव्या गाईडलाईन्स जारी

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

कोरोनाचा धोका पुन्हा वाढलेला आहेच. किंबहूना सप्टेंबरमध्ये सर्वोच्च बिंदू गाठला होता त्याच्या जवळपास किंवा पार गेला आहे. पुन्हा लॉकडाऊन करणं हा एक मार्ग आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना लॉकडाऊन संदर्भात भाष्य केलं. कोरोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करणं हा एक मार्ग दिसतोय. मात्र, जनतेने त्याकाळी जसं सहकार्य केलं तसंच सहकार्य आता करतील अशी अपेक्षा आहे. माझी जनता नक्की सहकार्य करणार, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. जेव्हा सुरुवातीला कोरोना आला तेव्हा काही नव्हतं. आता लस आली आहे. स्वत:हून पुढे येऊन कोरोना लस घ्यावी, यानंतरही मास्क वापरावा. कोरोना लस कुठेही कमी पडणार नाहीत, संपूर्ण राज्यात लसीकरणाची केंद्र उघडली आहे. काही ठिकाणी केंद्र वाढवली आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

राज्य शासनाने कोविडचा वाढत प्रादुर्भाव पाहता मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये (आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत. सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या विभाग व कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे असेही या आदेशात म्हटले आहे.

नाट्यगृहे व सभागृहे यामधील उपस्थिती देखील ५० टक्के असावी तसेच त्यांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा दिवसेंदिवस उद्रेक पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासात राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी नवा उच्चांक गाठला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मिशन बिगीन अंतर्गत काही नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

राज्य शासनाच्या कोरोनासंदर्भात नव्या सूचना

  • राज्यातील सर्व खासगी कार्यालये आणि आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारी संख्या ठेवा
  • नाट्यगृहे आणि सभागृहे यामधील उपस्थिती देखील ५० टक्के संख्या असावी
  • सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांच्या विभाग आणि कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे
  • आरोग्य आणि अत्यावश्यक सेवा तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळण्यात आलं
  • धार्मिक, सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी गर्दी करता येणार नाही.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!