मयत कोरोना रुग्णाच्या बोटाचा ठसा वापरून वॉर्ड बॉयनं ‘फोन पे’ वरून पैसे लाटले
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जालना (वृत्तसंस्था): राज्यात कोरोना च्या वाढत्या प्रभावा मुळे परिस्थिति दिवसेदिवस बिकट होत असताना परीस्थिती हाताबाहेर जात असल्याने उपचारा अभावी अनेक रुग्णांचा मृत्यू होतं आहे. लाखो रुपये खर्च करूनही रुग्णाचा जीव वाचवणे कठीण झाले आहे अशी महाभयंकर परिस्थिती असताना कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णाच्या बोटांच्या ठशांचा वापर करून रुग्णालयातील वॉर्ड बॉयनेच फोन -पे द्वारे त्यांच्या बँक खात्यातील रक्कम आपल्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केल्याची एक धक्कादायक व माणुसकीला काळीमा फासणारी घटना जालन्यात घडली आहे.
या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, जालना येथील जिल्हा कोविड रुग्णालयात एका वॉर्ड बॉयनं मयत कोरोना रुग्णाच्या बोटाचा ठसा वापरून ‘फोन पे’ वरून परस्पर पैसे आपल्या खात्यात ट्रान्स्फर केले. सदर रुग्ण जालना शहरातील इंदिरानगर येथील रहिवाशी असलेल्या कचरू पिंपराळे याची काही दिवसांपूर्वी कोरोना चाचणी पोझिटिव्ह आल्यामुळे त्यांना जिल्हा कोविड रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, त्यानंतर कचरू पिंपराळे यांच्या खात्यातून काही पैसे ट्रान्सफर झाल्याचं कुटुंबीयांच्या लक्षात आलं. त्यांनी त्याचे बँक स्टेटमेंट व मोबाईल डिटेल चेक केलं असता कचरू पिंपराळे यांच्या मोबाईलमधून अंगठ्याचा ठसा वापरून फोनपे द्वारे 6800 रुपये ट्रान्सफर झाल्याचं त्यांना दिसून आलं. या बाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी वार्डबॉयला ताब्यात घेऊन यापूर्वीही असे गुन्हे केले आहेत का? याचाही तपास पोलिसांकडून केला जात