भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

‘माध्यमांवर दबाव तयार करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न’– देवेंद्र फडणवीसांचा आरोप

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नागपूर, मंडे टू मंडे वृत्तसेवा | राज्यात शुक्रवारी १० सप्टेंबर सर्वत्र गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यावेळी मुंबईच्या लालबागच्या राज्याच्या गणेश मंडळात प्रसार माध्यमांमध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाची होताना दिसून आली. यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. मीडियाकर्मींनी निकम यांना प्रेमाने, समजुतीने बोलण्यासं सांगितलं, त्यावेळी त्यांचा पारा आणखी चढल्याचं पाहायला मिळालं. या प्रकारावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर आरोप करत हल्ला चढवला आहे. ‘माध्यमं आपलं काम करत होते. जास्त गर्दी नव्हती. त्यांच्याकडे पासेस होते. अशावेळी त्यांना मारहाण, धक्काबुक्की करणं योग्य नाही. माध्यमांवर दबाव निर्माण करण्याचं काम हे सरकार करत आहे. ‘मागील दोन वर्षांपासून आपण पाहत आहोत. माध्यमांवर एकप्रकारे दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. कधी गुन्हे दाखल करायचे, कधी कुणाला अटक करायची, कुणावर अन्य प्रकारच्या कारवाया करायच्या, एकप्रकारे लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे. माध्यमांवर प्रचंड दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे’, असा आरोपही फडणवीस यांनी यावेळी केला आहे. मागील दोन वर्षांपासून असे प्रकार सुरु आहेत. इतकी दंडुकेशाही योग्य नाही. याची दखल सरकारने घेतली पाहिजे. कारवाई तर झालीच पाहिजे पण अशाप्रकारे दंडुकेशाहीच्या जोरावर जर आपण कायदा आणि सुव्यवस्थेच्या गप्पा मारत असू तर ते काही योग्य नाही. अतिशय चुकीचं हे वर्तन आहे आणि याबाबत कारवाई झाली पाहिजे’, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

लालबागचा राजा गणपतीचं कव्हरेज करण्यासाठी पत्रकार जमले होते. या पत्रकारांकडे अधिकृत प्रवेशाचे पास होते. चार दिवसापूर्वी सर्वांना हे पास देण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांनी पास दाखवून प्रवेश देण्याची विनंती केली. त्यावेळी PI संजय निकम यांनी अरेरावी करण्यास सुरुवात केली. प्रवेश देणार नाही, इथून दोन मिनिटात बाहेर पडा, असं म्हणत संजय निकम यांनी थेट पत्रकारांशी धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पत्रकारांनी संजय निकम यांनी समजुतीने घेण्यास सांगितलं. तरीही संजय निकम यांनी धक्काबुक्की चालूच ठेवली. त्यावेळी संजय निकम यांना हात लावू नका, धक्काबुक्की करु नका असं सांगितलं. त्यावेळी संजय निकम म्हणाले, हात काय, पाय सुद्धा लावू शकतो, असं म्हणत पत्रकाराला काठी दाखवली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!